satyajeet tambe letter to amit deshmukh  e sakal
महाराष्ट्र बातम्या

'लता दीदींच्या अंत्यसंस्कारात मराठी कलाकारांना...', काँग्रेस नेत्याचं सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passes Away) यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार (Lata Mangeshkar Funeral) करण्यात आले. पण, याठिकाणी मराठी कलाकार दिसले नाहीत, अशी चर्चा रंगली होती. मराठी कलाकारांना प्रवेश नाकारल्याचेही वृत्त होते. त्यावरूनच आता काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं? -

मराठी चित्रपटसृष्टीतून लता दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही गेलं नाही, अशी टीका समाजमाध्यमातून झाली. माझ्या मनात देखील हा प्रश्न आला होता. परंतु लता दीदींच्या अंत्यसंस्काराला येऊ इच्छिणाऱ्या अनेक मराठी कलाकारांना शिवाजी पार्कवर प्रवेश देण्यात आला नाही, हे समोर आले तेव्हा मला खूप वाईट वाटले. मराठी कलाकारांना प्रवेश नाकारताना प्रोटोकॉलचे कारण पुढे करण्यात आले. प्रोटोकॉल आणि सुरक्षा या गोष्टी मला मान्य आहेत. पण, अशा महत्वाच्या प्रसंगी मराठीतील छोटे-मोठे कलाकार झाकोळले जातात. ग्लॅमर कमी असल्याने त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मुंबईत होणाऱ्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांना प्रवेश नाकारण्याचे प्रकार अनेकदा घडले. मराठी कलाकारांना नेहमीच अवहेलनेला समोरे जावे लागते. भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती मराठी माणसाने केली असताना मुंबईत मराठी कलाकारांना तुच्छेतेची वागणूक मिळते हे योग्य नाही, असं सत्यजित तांबे यांनी पत्रात म्हटलं आहे.

''आम्हाला प्रवेश मिळविण्यासाठी खूप अडचणी आल्या'' -

''लता दीदींच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कवर गेलो. पण, प्रवेशद्वारातून आत सोडलं नाही. शेवटी खूप विनंती केल्यानंतर आत सोडलं. पण, आम्हाला थांबवून ठेवण्यात आलं. इतक्यात अमिर खानसारखे मोठे बॉलीवूड कलाकार आले त्यांना थेट आमच्या बाजूनं आत सोडलं. गोष्ट जेव्हा भांडणावर आली त्यावेळी दोन महिला पोलिस टाळी देऊन हसत होत्या आणि तुम्ही कलाकार असेल तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं म्हटलं. मराठी कलाकारांना मराठी पोलिसांनी रोखलं'', असं अभिनेत्री हेमांगी कवीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

नवी मुंबई एअरपोर्टचा मोठा धमाका! ४६ नव्या शहरांसाठी उड्डाणांची घोषणा; उन्हाळी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या मार्ग...

Latest Marathi News Live Update : ऋषी वैद्य यांच्यावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

SCROLL FOR NEXT