Teltumbade_Navlakha_Koregaon_Bheema 
महाराष्ट्र बातम्या

कोरेगाव भीमा : नवलखा, तेलतुंबडे यांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांची अटकपूर्व जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.१६) फेटाळली. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने दोघांनाही येत्या तीन आठवड्यांत शरण जाण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर दोघांना आपले पासपोर्ट जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवलखा आणि तेलतुंबडे या दोघांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठीची मुदत १६ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. 

१ जानेवारी २०१८ ला पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा गावात हिंसाचार झाला होता. याप्रकरणी नवलखा, तेलतुंबडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे आढळून आल्याने पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, सर्व आरोपींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पुण्यातील सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर तेलतुंबडे आणि नवलखा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उपलब्ध पुरावे पाहता नवलखा आणि तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत १४ फेब्रुवारीला जामीन अर्ज नाकारला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, यासाठी चार आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते.

दरम्यान, कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचारावेळी झालेल्या दूरध्वनी संभाषणांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला दिले आहेत. तसेच या प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला अशांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT