School Reopening Updates in Maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील फक्त 'या' जिल्ह्यांमध्येच शाळा सुरू, वाचा नियमावली!

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी हा निर्णय नसल्याने काही ठिकाणी संभ्रमाची परिस्थिती आहे. मात्र विद्यार्थ्यांना न घाबरता शाळेत पाठवावे असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. (Schools Reopen in Maharashtra)

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज, आजपासून पहिली ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने गुरुवारी त्याबाबत नियमावली जाहीर केली. शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक यांनी काय काळजी घ्यावी याबाबत त्यात सूचना देण्यात आल्या आहेत. (maharashtra School Restrictions)

शाळा सुरू होत असल्या तरी मुलांनी शाळेत येणं बंधनकारक नाही. मुलांनी व पालकांनी मिळून त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार शाळेत जाण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी किंवा त्याच्या घरातील कोणीही आजारी असल्यास विद्यार्थ्याला शाळेत पाठवण्यात येऊ नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. (School Reopening Updates in Maharashtra)

नाशिकमध्ये शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील शाळा 100 टक्के क्षमेतेने, तर शहरातील शाळा 50 टक्के विद्यार्थी क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

काय आहे नियमावली ?

स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार

शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत

शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का, याची पडताळणी

स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या

एक निर्णय घेतो, म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं नाही

कुठे शाळा सुरू...आणि कुठे बंद?

राज्यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरीही पुण्याबाबत वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त आणि महापौरांसोबत झालेल्या बैठकीनंतर शाळा बंदच राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. कोरोनाची आकडेवारी झपाट्याने उचवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याबाबत येत्या आठवड्यात निर्णय येणं अपेक्षित आहे.

यासोबतच पिंपरीृ-चिंचवड आणि नागपूरसाठी हीच नियमावली जाहीर झाली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या शाळा तूर्तास बंद राहतील. औरंगाबाद, बीड आणि नांदेडमध्ये फक्त १० वी आणि १२ वीच्या शाळा सुरू आहेत. यवतमाळ, जालना, नंदुरबारमध्ये शाळा बंद राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT