Rajesh Tope Twitter
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शाळा आणखी 15 दिवस बंद राहतील: राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आता सध्या पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये पण काळजी घेणे गरजेचे आहे. सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यामुळेच काही निर्णय सतर्क राहण्याच्या दृष्टीने घेण्यात आले आहेत.

पुढे त्यांनी शाळांबाबतच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, शाळांच्या बाबत देखील प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता मराठवाडा आणि विदर्भात देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आणखी 15 दिवस तरी शाळा बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर निरीक्षण करुनच शाळेसंदर्भातील योग्य तो निर्णय घेण्यात येऊ शकेल, असं त्यांनी म्हटलंय.

राज्यात 46 हजार कोरोनाबाधित

राज्यात आज 46 हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, त्यामुळे रूग्णसंख्या कमी होतीये अशा भ्रमात जनतेने राहू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 21.4 आहे, तर हाच दर आज मुंबईचा 27 टक्के असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. रूग्णसंख्या जरी वाढत असली तरी 86 टक्के लोक हे होम क्वारंटाइनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तर 1 टक्क्यापेक्षा कमी रूग्ण आयसीयूत असून 0.32 टक्के रूग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT