Nana Patole Modi Statement Controversy nana patole
महाराष्ट्र बातम्या

मोदींबद्दलच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक, पटोलेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी ''मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो'' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपचे (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे नाना पटोलेंच्या नागपूर आणि मुंबई अशा दोन्ही घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. त्यांच्यासोबत चर्चा करताना नाना पटोले म्हणाले, '' मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.'' त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा येथे तक्रार दाखल केली आहे. तसेच नागपुरात बावनकुळे यांनी पटोलेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पटोलेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अधिकचे पोलिस बळ तैनात करण्यात आले आहे.

पटोलेंच्या वक्तव्याबद्दल भाजप आक्रमक होताच पटोलेंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली. मी गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो. तो ग्रामस्थांना त्रास देत होता. त्यामुळे मी त्या मोदीबद्दल बोलत होते. मोदी नावाचे एकटेच व्यक्त नाहीत. माझं वक्तव्य खोडसाळपणे व्हायरल केलं जात आहे, असं पटोले म्हणाले.

भाजपच्या बड्या नेत्यांकडून नाना पटोलेंच्या अटकेची मागणी -

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोलेंनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी केली. नारायण राणेंनी देखील पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंचा समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT