Shahaji Bapu Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

'झाडी, डोंगार अन् हाटील'चं कौतुक सांगणाऱ्या आमदाराची संपत्ती माहितीये का?

शहाजीबापू पाटलांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यावर अनेक मीम्स बनवले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांचं ऐतिहासिक बंड सध्या चांगलंच चर्चेत आहे. सरकार पडणार की नाही, बंड शमणार काी नाही, असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडलेले आहेत. अशातच सोशल मीडियावर मात्र वेगळंच वारं वाहतंय. झाडी, डोंगार अन् हाटील या तीन शब्दांची जोरदार चर्चा आहे. (Rebellion shivsena MLA trending on social media)

काय आहे झाडी, डोंगार अन् हाटील?

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेते त्यांच्यासोबत गेले. गेल्या चार दिवसांपासून ते गुवाहाटीमधल्या एका हॉटेलमध्येच आहेत. या सर्वांपैकीच एका आमदाराची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालीये. हा आमदार आपल्या कार्यकर्त्याला आपण सहिसलामत असल्याचं सांगताना या बंडाचं रसभरीत वर्णन करतोय. आजूबाजूच्या परिस्थितीचं वर्णन करताना हा आमदार सांगतोय की, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओकेमध्ये सगळं!

कोण आहे हा आमदार?

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (MLA ShahajiBapu Patil) यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यावरुन आता प्रचंड मीम्स तयार होत आहेत. तसंच गुगलवर शहाजीबापू पाटील कोण, त्यांचा मतदारसंघ कोणता, ते कोणती गाडी वापरतात, त्यांची संपत्ती किती असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

शहाजीबापू पाटलांची संपत्ती किती?

शहाजीबापूंनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या आकड्यांनुसार, त्यांच्याकडे १६ लाख किमतीची एक फोर्ड एन्डेव्हर गाडी आहे, जी त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तर तीन लाख ८० हजार किमतीचं १०० ग्रॅम सोनंही त्यांच्याकडे आहे. स्वतःच्या नावावर ८२ लाख ६१ हजारांची शेतजमीन तसंच इमारती असून पत्नीच्या नावावर २८ लाख २८ हजारांची जमीन आहे. तर २० लाख ४० हजारांची पडीक जमीनही शहाजीबापूंच्या नावे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT