shambhuraj Desai scolded officials karad satara political news
shambhuraj Desai scolded officials karad satara political news  
महाराष्ट्र

...तर तू वाचलाच नसतास, शंभूराज देसाईंचा अधिकाऱ्याला दम

सकाळ डिजिटल टीम

सातारा : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे काम जोमात सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले शिवसेनेचे नेत शंभूराज देसाई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. दरम्यान आज सातारा येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांनी पत्रकारांसमोरच एका अधिकाऱ्याला झापडल्याचा प्रकार समोर आला. देसाई यांनी अधिकाऱ्यांना तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? दुसरा कोण अधिकारी आहे, तुझ्या सोबत. लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास, असा दम भरला..

मिळालेल्या माहितीनुसार मंत्री शंभूराज देसाई हे आज पत्रकार परिषद घेण्यासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. दरम्यान त्याआधी काही मिनीटे अचानक तेथील वीज पुरवठा खंडीत झाला. अचानक वीज गेल्याने मंत्री देसाई संतापले. त्यांनी राज्य उत्पादन विभागाच्या एका अधिकाऱ्याला बोलावून घेऊन आत्ताच लाईट कशी गेली? अशी विचारणा केली. त्यावेळी, "साहेब मला माहित नाही...मी नवीन आहे...," असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई यांना नम्रपणे सांगितले. मात्र संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

पुढे देसाई पुढे त्या अधिकाऱ्याला म्हणाले की, तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? दुसरा कोण अधिकारी आहे, तुझ्या सोबत. लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास, असा दमच त्यांनी अधिकाऱ्याला भरला. तसेच पीए व अधिकाऱ्यांनी त्याला समजून सांगा, मला असले चालत नाही असे सांगून त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली. यामुळे याचीच चर्चा आज दिवसभर कराड मध्ये सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

Sangli News : दिवसाढवळ्या 'खून करणारं गाव' म्हणून मिळाली ओळख, पण प्रवाहाच्या विरोधातही उभं राहिलं गाव!

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना अलर्ट

Panda Dogs in Zoo : प्राणीसंग्रहालयात नव्हते पांडा म्हणून चक्क कुत्र्यांनाच दिला ब्लॅक अँड व्हाईट रंग; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Narendra Dabholkar Case Live Updates: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

SCROLL FOR NEXT