Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

शंभूराज देसाईंचं कॅबिनेट मंत्रिपद फिक्स; शिवेंद्रराजे, गोरेंनाही मंत्रिपदाची लॉटरी?

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीवेळी शिवेंद्रराजे व गोरेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का?

सातारा : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पायउतार झाल्यानंतर आता भाजप आणि शिंदे गट सत्ता स्थापन करणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosale), जयकुमार गोरे (Jayakumar Gore), तर शिवसेनेकडून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) मंत्रिपदाचे दावेदार ठरले आहेत. त्यातही पालकमंत्री पदासाठी भाजप, सेनेकडून दावा केला जाणार असल्याने पालकमंत्रिपद नेमके कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीवेळी शिवेंद्रसिंहराजे व जयकुमार गोरेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का? याकडे या नेत्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट तसेच मनसे एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहे. या नव्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार, हे निश्चित आहे. त्यांच्यासोबत बंडात सहभागी माजी मंत्री शंभूराज देसाई व महेश शिंदे यांच्याही पदरात काही पडेल, अशी आशा आहे. शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. त्यासोबतच त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे; पण भाजपकडून पालकमंत्रिपदासाठी दावा केला जाऊ शकतो. सध्या तरी सोशल मीडियावर महेश शिंदेंना कृष्णा खोरे विकास महामंडळ मिळणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे महेश शिंदेंच्या पदरात काय पडणार? याकडे कोरेगावकरांचे लक्ष आहे.

भाजपचे जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार? हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादीने गेल्या तीन पंचावार्षिक आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद दिले नव्हते. त्याला जुनीच कारणे आहेत. याची सल त्यांच्या मनात होती. मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांना देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिपद व पालकमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चौथ्यांदा ते सातारा- जावळीचे आमदार झाले; पण राज्यात भाजपची सत्ता येऊ शकली नाही. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात पुन्हा भाजप, एकनाथ शिंदे गट व मनसे याची सत्ता येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज म्हणून भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची संकेत मिळत आहे. त्यानुसार त्यांना सहकारमंत्री व पालकमंत्रिपदही दिले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन फडणवीस शब्द पाळणार का? याची उत्सुकता आहे. सध्यातरी सातारा, पाटण, कोरेगाव व माण तालुक्यांतील आमदार समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

शिवेंद्रसिंहराजेंना भाजप संधी देणार?

साताऱ्याचे भोसले घराण्याने राज्याच्या राजकारणावर चांगला ठसा उमटविला आहे. माजी मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसच्या काळात महत्त्वाच्या मंत्रिपदावर होते. मात्र, त्यांना नंतर राष्ट्रवादीने मंत्रिपदापासून दूर ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही राष्ट्रवादीने मंत्रिपद दिले नाही. आता त्यांचे चार मतदारसंघांत वर्चस्व आहे आणि भाजपला त्यांनी साथ दिली आहे. याचा विचार करून त्यांना या वेळी मंत्रिपद दिले जाईल, अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, तर शंभूराज देसाई यांनी मंत्रिपद असतानाही बंडखोरांना साथ दिली. त्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT