Shankarrao Chavan  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shankarrao Chavan : "तेव्हाच शंकरराव चव्हाण यांचं ऐकल असतं तर.." अखेर पवारांना आपली चूक मान्य करावी लागली

शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लिहिलेल्या लेखात मान्य केली चूक

धनश्री भावसार-बगाडे

Shankarrao Chavan Birth Anniversary 2023 : माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्रातील एक अत्यंत जाणते, संवेदनशील, अभ्यासू आणि जलतज्ज्ञ असलेलं व्यक्तीमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. त्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त काही विशेषांक काढण्यात आले होते. यापैकीच लोकराज्यच्या विशेषांकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या सोबत काम करतानाचे काही अनुभव आणि आठवणी सांगितले आहेत.

त्यातच त्यांनी त्यावेळी झालेल्या एक चुकिची कबुली दिली आहे, ज्याचे राजकीय परिणाम आज बघायला मिळत आहेत.

शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात शरद पवार यांनी आणि पवारांच्या मंत्रिमंडळात चव्हाण यांनी काम केले असल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. अभ्यासू आणि उत्तम प्रशासक म्हणून शंकरराव यांचा उल्लेख सर्वत्र केला जातो.

शंकरराव वक्तशीर असल्याचे सांगत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्याचे मंत्री बरोबर साडेदहाला मंत्रालयात येतात का हे पाहणे याकडे त्यांचा कटाक्ष होता. साडेदहा ते दीडपर्यंत मंत्र्यांनी प्रशासकीय काम करावे, नंतर उर्वरित काम करावे आणि दोननंतर जो काही जनता दरबार आहे तो भरवावा यासाठी ते आग्रही होते. त्यामुळे त्यांना हेडमास्तरही म्हटले जायचे, पण एक प्रशासक म्हणून ते निश्चितच योग्य होते असे म्हणायला हवे.

पाण्याचा वापर समाज जीवन बदलण्यासाठी

चव्हाण पाटबंधारे मंत्री होते तेव्हा, १९६७ला राज्याच्या विधिमंडळात पवार आमदार होते आणि त्या वेळी शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाण्यासंदर्भात निर्माण केलेल्या समितीत ते होते. या समितीने अनेक जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात पवारही सहभागी होते. विविध गावांना भेटी दिल्या. अनेक समस्यांचे मूळ पाण्याची कमतरता आहे हे ओळखून राज्यातील पाण्याचा वापर हा येथील समाजजीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह होता.

त्यांनी पाण्याचा थेंब अन् थेंब समाजजीवनासाठी वापरला जावा म्हणून अनेक धरणांचे बांधकाम केले.

या वेळची एक आठवणही सांगतली आहे, उजनी हे सोलापूरचे भाग्यविधाते ठरणारे धरण त्यांच्या प्रयत्नांतून झाले. एकेकाळी दुष्काळी जिल्हा असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे आज ३९ साखर कारखाने आहेत ते शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. या धरणाचे भूमिपूजन ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.

त्या वेळी पवार आमदार म्हणून उपस्थित होतो. त्या वेळी ते म्हणाले होते. "उजनी धरण भीमा नदीवर आहे आणि तीच नदी अडवली जाणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आलेला विठ्ठलभक्त चंद्रभागेत स्नान करण्याचीही आशा ठेवतो. पण हे पाणी अडवले तर त्या विठ्ठलालाही आवडेल. कारण हे पाणी खेड्यापाड्यांतील शेतकऱ्याच्या शिवारात पोहोचेल आणि त्या पाण्यावर उगवलेल्या शाळू (ज्वारी) चे दाणे तो त्या विठ्ठलाला अर्पण करेल."

इथे झाली पवारांची चूक

राज्याचा एकसंध विकास व्हावा आणि राज्य एकसंध राहावे यासाठी वैधानिक विकास महामंडळाचा प्रस्ताव पवारांनी विधानमंडळात मांडला आणि तो मंजूरही झाला. त्या वेळी या विकासमंडळाला कडाडून विरोध कोणी केला असेल तर तो शंकरराव चव्हाण यांनी.

त्यांचे म्हणणे असे होते की, लोकप्रतिनिधींचे अधिकार राज्यपालांच्या हातात देणे योग्य नाही. पवारांनी खरे तर त्या वेळी शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे मान्य केले नाही. ही त्यांची चूक होती हे त्यांनी या लेखाद्वारे मान्य केले.

झिरो बजेट या शंकररावांच्या कल्पनेलाही त्यांनी प्रचंड विरोध केला परंतु त्या त्या परिस्थितीत तीही योग्य होती, असंही त्यांनी यात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahapalika Election: सर्वात मोठी बातमी! 'या' प्रभागातील निवडणूकीला न्यायालयाची अंतरिम स्थगिती, मतदान कधी होणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

Madhav Gadgil: ‘नीरी’ला कटू सत्याची करून दिली आठवण; पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण अहवालातील त्रुटी केल्या होत्या उघड!

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT