महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'दुर्लक्ष नाहीच! कुस्तीपटूंच्या मागण्या मान्य कराव्यात,' शरद पवारांनी पुन्हा सावरली मोदी सरकारची बाजू?

राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण

धनश्री ओतारी

सरकारची बाजू मांडत कुस्तीपटूंच्या आंदोलनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारची बाजू अप्रत्यक्षपणे मांडण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले शरद पवार?

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष‎‎ करत असल्याचा आरोप होत आहे. यावर, शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. 'कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं अस काही नाही. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.'

यापूर्वीही शरद पवार यांनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे. नविन संसद भवन उद्घाटनावेळी संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. यानंतर पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत.” असं पवार म्हणाले.

भाजपचे खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी लैंगिक शोषणाचे व मानसिक छळाचे आरोप केले आहेत. बजरंग पुनिया यानंही असेच आरोप केले आहेत. बृजभूषण याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT