Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, दिलासा देत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मोठे विधान केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिन्हाच्या वादात आता पडणार नाही, असे पवार म्हणाले होते. यापूर्वी देखील शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ही चर्चा झाल्याची चर्चा आहे. यावेळी आगामी कायदेशीर लढ्यासंदर्भात देखील पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केल्याची माहिती आहे.

सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे राजकारणात तणावाचे वातावरण आहे. कायदेशीर घडामोळी देखील राज्यात घडत आहेत. 

महाविकास आघाडी तुमच्या पाठीमागे पुर्णपणे उभी आहे, असा दिलासा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीसाठी धोकादायक असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचा निर्णय सत्य आणि जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT