ncp chief sharad pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांचा मोठा निर्णय;राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग तसंच सेल बरखास्त करण्यात आले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.(Sharad Pawar Dissolves All Departments Cells Of NCP Gives No Reason)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता राष्ट्रवादीचे सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त केले आहेत, असे ट्विट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल पटेल यांची सही असलेल्या पत्रात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

याशिवाय प्रफुल पटेल यांनी ट्विट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT