Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांनी सदानंद गौडांचे टोचले कान; खतदरवाढीबाबत लिहलं पत्र

केंद्रीय रसायने व खतेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पवार यांनी सणसणीत पत्र पाठवून खतदरवाढीबाबत कान टोचले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोविड १९ साथीच्या विरोधात देशातील शेतकरी (Farmer) वर्ग लढा देत असताना रासायनिक खतांच्या दरात (Chemical Fertilizer Rate) झालेली वाढ धक्कादायक आहे. सरकारने (Government) ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्राकडे केली आहे. (Sharad Pawar DV Sadanand Gauda Letter for Fertilizer Rate)

केंद्रीय रसायने व खतेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पवार यांनी सणसणीत पत्र पाठवून खतदरवाढीबाबत कान टोचले आहेत. ‘देशवासीय सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने उद्‌ध्वस्थ झाले आहेत. भारतीय शेतकरी सर्वांत मोठ्या संकटाचा सामना करीत असून त्यांच्या व्यथा तातडीने समजावून घेण्याची ही वेळ आहे. पण त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी केंद्राने खतांची भरमसाट वाढ केली आहे,’’ असे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘लॉकडाउनमुळे बाजारपेठा डळमळीत झालेल्या आहेत. मॉन्सून दारात उभा असताना खत दरवाढीचा निर्णय दुर्देवी आहे. त्यामुळे देशातील पेरणीपूर्व शेती कामे बाधित होतीलच; पण भविष्यातील उत्पादन खर्च व पिकांच्या उत्पादकतेवरही परिणाम होईल. खत दरवाढीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे,’’ अशा शब्दांत पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी लिहिलेले या संदर्भातील पत्र देखील पवार यांनी गौडा यांना पाठविले आहे.

चव्हाणांच्या पत्राची तत्काळ दखल

औरंगाबाद : खतांच्या वाढलेल्या किमती संदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना मंगळवारी (ता. १८) पत्र देऊन लक्ष घालण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पवार यांनी केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकरी हितासाठी यामध्ये लक्ष घालण्याची सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'५५५ बीडी'च्या मालकाची मुलानेच केली हत्या, गोळी झाडून घेत स्वत:लाही संपवलं; काय घडलं?

Bengaluru Doctor Case : मी तुझ्यासाठी तिला मारलं, पत्नीच्या हत्येनंतर लग्नाचे प्रस्ताव नाकारलेल्या महिलांना केले मेसेज

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

Dry Eye Risk in Youth: डिजिटल युगात डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे तरुणाईंला 'Dry Eye'चा धोका! शरीरात हे बदल दिसताच करा पुढील उपाय

Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

SCROLL FOR NEXT