Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Mandir : पवार-शिंदेंची भेट ज्या कारणासाठी चर्चेत आली ती 'मराठा मंदिर' संस्था काय आहे?

Sandip Kapde

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गुरुवारी (१ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम २४ जून रोजी मुंबईत होणार आहे.

शरद पवार हे मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे मराठा मंदिर संस्था काय आहे?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

शिवसेना (UBT) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर आहेत, अशा वेळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला आले आहेत. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट व्हावी यासाठी शरद पवार सध्या प्रयत्नशील आहेत.

मराठा मंदिर संस्था काय आहे?

मराठा मंदिर ही धर्मादाय संस्था १९४५ मध्ये स्थापन केली होती. ही संस्था अशा लोकांनी स्थापन केली होती ज्यांना असे वाटले होत की आगामी स्वातंत्र्य भारताचा गौरवशाली भूतकाळ परत आणणार नाही. ८० टक्के लोक ग्रामीण भागात शिक्षणाशिवाय राहतात. यांना शिक्षित करण्यासाठी , त्यांना  ते राष्ट्रासाठी काय करू शकतात याची जाणीव करून देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती.

मराठा मंदिर ही संस्था धर्म, जात, भाषा यांची पर्वा न करता प्रत्येकासाठी खुली असेल असा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. संस्थापकांनी या संस्थेला "मराठा मंदिर" हे नाव "मराठा" या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला आपले अधिवास मानणार्‍यांना आणि मानवी जीवनातील पवित्रता दर्शवण्यासाठी "मंदिर" असे ठेवले.

बाबासाहेब गावडे या नावाने ओळखले जाणारे स्वर्गीय श्री जी.जी. गावडे यांनी लोकांना शिक्षित करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले होते. त्यांनी ब्रिटीश भारतातील पोलीस विभागातील एक आशादायक कारकीर्द सोडून दिली आणि या मिशनसाठी स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी १९४५ मध्ये मराठा मंदिराची स्थापना केली.

ही धर्मादाय संस्था जात-पात, धर्म, भाषा यांचा विचार न करता सर्वांसाठी खुली आहे. आज ही इमारत मुंबई सेंट्रल येथे उंच उभी आहे. जी एक सक्रिय आणि बहुआयामी संस्था आहे. आजही ते विद्यार्थ्यांना भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट उघड; जालन्यात अमोल खुणे, दादा गरुड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

Malkapur Accident : 'ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी'; मलकापूरनजीक अपघात, दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT