Sharad Pawar uddhav uddhav thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य !

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar: नाशिक येथे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणासंदर्भात बोलणे अपेक्षित असताना शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की देशाला कृषिसंपन्न बनवताना देशातील सर्वात मोठी ७० हजार कोटींची कर्जमाफी करून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले.

मोदी सरकार येण्यापूर्वी देशात काहीही चांगले घडले नसल्याचे भासवले जात आहे. यास गद्दारही तितकीच साथ देत असून, ते सर्व दिल्लीश्‍वरांच्या पायी नतमस्तक झालेले आहेत. महाराष्ट्राची इतकी लाजिरवाणी स्थिती कधीच नव्हती. या सर्व गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची वेळ आली असून, याची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तर दुसरीकडे जाती, धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम काही देशविघातक मंडळी करत आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी आज देशाला एकोप्याची गरज आहे. भलेही पक्षीय मतभेद असतील. हे मतभेद विसरून देशाच्या भल्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन कामाला लागण्याचे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी श्रीवर्धन (जि. रायगड) येथे केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख नेते रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्‍घाटनप्रसंगी एकत्र आले होते. या वेळी माजी मंत्री पवार बोलत होते. देशात एकोपा टिकवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष तसेच इतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाच्या विकासासाठी हा निर्णय असल्याने आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या, अशी साद शरद पवार यांनी उपस्थितांना घातली. या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करत असून, त्यांचा हा ढोंगीपणा ‘इंडिया’ आघाडी त्याच क्षमतेने उघडा पाडणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, आमदार अबू आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Marathi News Live Updates : नंदुरबार पंचायत समितीवर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; अपमानास्पद वागणूक आणि प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले!

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

SCROLL FOR NEXT