Sharad Pawar_Devendra Fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

"...तर शरद पवार आता काशीचा घाट दाखवतील"

फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेलक्या शब्दांत टीका केली होती त्याला आता मलिकांनी उत्तर दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असल्याच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाष्य केलं आहे. यापूर्वीच शरद पवारांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवलाय यापुढेही त्याचं असंच सुरु राहिलं तर काशीचा घाट दाखवतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar has already shown Katraj Ghat to BJP now they will show Kashi Ghat says Nawab Malik)

मलिक म्हणाले, शरद पवार मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेत सदस्य म्हणून निवडून आलेले नाहीत. कालपर्यंत ज्यांच्या राज्यात २५-३० जागा निवडून येत होत्या ते पवारांवर भाष्य करत आहेत. याअगोदरही पवारांवर फडणवीस भाष्य करत होते, त्यावेळी काय झालं? असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, शरद पवारांवर बोलणार्‍या देवेंद्र फडणवीसांना पवारांनी यापूर्वीच कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही ते बोलत राहिले तर त्यांना काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

“बाल्कनीतून आगीचा गोळा जाताना पाहिला…” करवा चौथमुळे वाचलेला अभिनेते जितेंद्र यांचा जीव, म्हणाले...

४ वर्षात मोडला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा संसार? थाटात केलेलं लव्हमॅरेज; आता नवऱ्याला केलं अनफॉलो

४ नेत्यांची सेम स्क्रीप्ट! दुसऱ्या पक्षातून भाजपात आले, ६ वर्ष वेटिंगनंतर थेट मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT