Sharad Pawar on sambhaji maharaj controversy dharmaveer Anand dighe eknath shinde thane  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही धर्मवीर, मग...; शरद पवारांचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar on Sambhaji Maharaj Controversy : छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणावं की स्वराज्य रक्षक हा मुद्द्यावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यानी आज या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

या वादावर बोलताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याची कोणाला स्वराज्य रक्षक म्हणून आठवण होत असेल तर त्यांच्या तसा उल्लेख करायला हरकत नाही. तसेच त्यांना धर्मवीर बोललं तरी माझी काही तक्रार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

धर्मरक्षक या संबंधीचा उल्लेख करण्याबाबत पुढे बोलताना पवार म्हणाले की, मला एक काळजी आहे की, मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे समोर येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जातं. ठाण्यामध्ये सरकारच्या जाहीरातीमध्ये देखील त्यांचा धर्मवीर असा उल्लेख केला जातो, माझा विरोध नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

धर्मवीर असो की स्वराज्य रक्षक ज्या व्यक्तीला जशी आस्था असेल आणि आस्थेच्या पाठिमागे जो विचार आहे त्या विचारातून ती आस्था असेल तर वाद करण्याचं काही कारण नाही असेही शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणाले होते

नागपूरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनाच्या शेवटत्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, तर ‘स्वराज्य रक्षक’ होते, असे विधान केले होते.या वादग्रस्त विधानावरून राज्यात भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT