Sharad Pawar And Supriya Sule
Sharad Pawar And Supriya Sule 
महाराष्ट्र

हट्ट पुरवल्यानेच सुप्रिया राजकारणात, अन्यथा...; शरद पवारांनी उकललं गुपित

सकाळ डिजिटल टीम

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेकदा त्या संसदरत्न ठरल्या. मात्र सुप्रिया यांच्या राजकारणात येण्याविषयी शरद पवार यांनी आज मोठं गुपित उकललं. पुणे डॉक्टर असोसिएशनच्या 'सिंगल डॉक्टर फॅमिली' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं की, की माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं नाही. तिला इच्छा पण नाही तशी, अशा आशयाची मुलाखत दाखवण्यात आली. त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही खळखलळून हसले. यावर पवार म्हणाले की, सुप्रिया राजकारणात येईल असं वाटलं नव्हत असं मी म्हणलो. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल असेसमेंट कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल.

शरद पवार पुढं म्हणाले की, माझ्यावर झालेल्या संस्कारांचे श्रेय माझ्या आई चं. घरात कोणी शिक्षित नव्हते. पण आईनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे माझा स्त्रियांविषयी विचार करण्याची मानसिकता तेव्हा पासूनच बदलली.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी आयुष्याला संघर्ष म्हणून बघत नाही. आपण अपेक्षा मापात ठेवल्या तर आयुष्य समाधानात जातं. असही सगळ्यांचं आयष्य १९-२० असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT