Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, उमेदवार मी ठरविणार’, आगामी निवडणुकांवर काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar: बारामती तालुक्याच्या राजकारणातील लक्ष मी मागील १५ वर्षांपूर्वीच कमी केलेले आहे. तेव्हापासून मी कधीही बारामती तालुक्यातील एकाही निवडणुकीत लक्ष दिलेले नाही, असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणालेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: बारामती तालुक्याच्या राजकारणातील लक्ष मी मागील १५ वर्षांपूर्वीच कमी केलेले आहे. तेव्हापासून मी कधीही बारामती तालुक्यातील एकाही निवडणुकीत लक्ष दिलेले नाही. मी पहिल्यापासूनच राजकारणात नेहमीच नवख्यांना संधी देत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (सोमवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवार यांनी सोमवारी भीमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी विविध स्टॉल्सची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता. २४) बारामतीतील सभेत बोलताना शरद पवार यांचे नाव घेता, त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षीच बंड केले होते. आम्ही तरी ६०व्या वर्षी बंड केले आहे. परंतु बंड करण्यापूर्वीसुद्धा तुम्ही आता थांबा, आता आम्हाला काम करू द्या, अशी विनंती त्यांना केली होती, असे म्हटले होते. याबाबत शरद पवार यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनीही अजित पवार यांचे नाव न घेता, वरील वक्तव्य केले.

पवार पुढे म्हणाले, ‘‘मी वयाच्या ३८व्या वर्षी बंड केलेले नव्हते. तेव्हा मी पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांच्या विचारांशी समरस होऊन, राज्यात नवीन सरकार स्थापन केले होते. त्यामुळे सरकार स्थापन करण्याच्या या प्रक्रियेला बंड म्हणता येणार नाही. मी पहिल्यापासून नेहमीच नवख्यांना संधी देत आलो आहे. याच तत्त्वानुसार १५ वर्षांपूर्वीच मी बारामती तालुक्यातील सहकारी साखर कारखाने, नगरपालिका यासारख्या संस्थांच्या निवडणुकीतून लक्ष कमी केलेले आहे.’’

‘मीच उमेदवार ठरविणार’

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कोणत्या व्यक्तीला पक्षाची अधिकृत उमेदवारी द्यायची, हे राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ठरवीत असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची याचा अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आहे. तो त्यांना (अजित पवार यांना उद्देशून व त्यांचे नाव न घेता) नाही, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT