Devendra Fadnavis Replied Sharad Pawar e sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांनी आता उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावे; फडणवीसांचा सल्ला

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सल्ला दिला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सल्ले द्यावे, असे विधान भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील सल्ला दिला. ते म्हणाले की, पवारांनी देशाची चिंता करू नये, जनता मोदींवर खूश आहे. (Devendra Fadanvis Statement On State Politics)

शरद पवारांनी इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष दिले तर अधिक बरं होईल. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्यावर जर एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या सरकारला जर निर्देश दिले तर, ते अधिक चांगले होईल, असा सल्ला फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला आहे. देशात मोदी सरकार (Modi Government) उत्तम काम करत असून, वेळोवेळी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या मोलाच्या सल्ल्याची गरज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असून त्यांना तो पवारांनी द्यावा, असे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले की, आम्ही ठाकरे सरकार विरोधात लढत असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील या सरकार विरोधात लढावे. दरम्यान, राज यांनी मुख्यमंत्र्यांना आज लिहिलेल्या पत्रावरूनदेखील त्यांनी यावेळी राज ठाकरे यांना मोलाचा सल्ला दिला. राज ठाकरे मुख्यमत्र्यांकडून इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले की, याबाबत मला फारसे काही माहित नाही. तसेच त्याबाबत माझं त्यांच्याशी काही बोलणंदेखील झालेले नाही. जर कुणी रामाच्या शरणी जात असेल तर, त्याला कुणी रोखू नये असे ते म्हणाले. मात्र, राज ठाकरेंना कशामुळे विरोध केला जात आहे या भूमिकेमागील नेमकं कारण आपल्याला माहित नसल्याचे फडणवीस म्हणाले.

योगींचे मुंबईत कार्यालय, फडणवीस म्हणतात...

योगींचे मुंबईमध्ये कार्यालय होणार आहे यावर बोलताना ते म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, येथे सर्व राज्यांची भवनं आहेत. त्याशिवाय अनेक राज्यांची गुंतवणूक कार्यालयं आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशने या ठिकाणी एखादं कार्यालयं मुंबईत काढलं तर, लगेच कुणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. मुंबई पावरफुल आहे, महाराष्ट्र पावर फुल असून, महाराष्ट्राची एक ताकद आहे शक्ती आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एखादं कार्यालय इथे सुरु झाले काय आणि नाही झालं काय काही फरक पडणार नाही. मात्र, ज्यापद्धतीने राज्यात कारभार सुरू आहे. काही मंत्री जेलमधून कारभार करतायेत. त्याशिवाय राज्यात ज्या पद्धतीने दुराचार सुरू आहे याचा परिणाम निश्चित महाराष्ट्रावर होईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT