Gunratna Sadavarte News e sakal
महाराष्ट्र बातम्या

सदावर्तेंना पुन्हा कोठडी की जामीन? आज निर्णय

आज पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे सदावर्ते यांना हजर केलं जाणार

सकाळ डिजिटल टीम

आज पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे सदावर्ते यांना हजर केलं जाणार

मागील काही दिवसांपासून एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. त्यांच्याविरोधात एखादा सबळ पुरावा शोधण्याचं काम मुंबई पोलिस (Mumbai Police) करत आहेत. दरम्यान, अधिकच्या तपासासाठी गावदेवी पोलिसांनी काल रात्री एक पथक सदावर्ते यांच्या घरी पाठवलं होतं. त्यामुळे आज यासंदर्भात निर्णय होणार आहे.

शुक्रवारी एसटी संपातील (ST Strike) काही संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलकांकडून पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली होती. मात्र आंदोलक या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे या घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी वकील सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अटकेत असलेले सदावर्ते हे सातत्याने पोलिसांवर आरोप करत आहेत. पोलिस त्यांना कोर्टात घेऊन आले तेव्हा 'माझी हत्या होऊ शकते, पोलिस लोकशाहीचा गळा घोटत आहेत', असा आरोप त्यांनी केला. अटकेच्या कारवाईदरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीवर सदावर्ते यांनी आक्षेप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT