Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: कार्यकर्त्यांच्या 'त्या' घोषणेनंतर शरद पवारांच्या पत्नी भडकल्या

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले होते.

शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला. त्यानंतर त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी निर्णय मागे न घेतल्यामुळे पुन्हा आवाज सुरू झाले. त्यानंतर गर्दीतून एक आवाज आला 'साहेब मोदीला जर हाकलायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही' या आवाजानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार चिडल्याचे दिसून आलं. तर शरद पवार यांनी हात वर करत त्यांना थांबवलं.

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

Latest Marathi News Live Update : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूक बिनविरोध, भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या

BMC Budget: राज्याने थकविले १५ हजार कोटी, महापालिकेची आता ठेवींवर मदार

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

SCROLL FOR NEXT