vishwambhar chaudhari and sharad ponkshe 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Ponkshe : पोंक्षेंना थेट आव्हान; 'या जाहीर चर्चेला, कधीही अन् कुठंही...'

मोदी-शहांचे दिल्ली पोलिस किंवा मग फडणवीसांचे मुंबई पोलिस कुणालाही घेऊन या, शरद पोंक्षेंना आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मोदी-शहांचे दिल्ली पोलिस किंवा मग फडणवीसांचे मुंबई पोलिस कुणालाही घेऊन या, शरद पोंक्षेंना आव्हान

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे चांगलेच चर्चेत आले आहेत. लहान मुलांना सावरकर समजले पण त्या दिल्लीतल्या घोड्याला सावरकर कळत नाही, अशी जाहीर टीका त्यांनी केली होती. पोंक्षे यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीका होत आहे. सोशल मीडियावरूनही त्यांना ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, सामाजिक विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनीही आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

डॉ. चौधरी यांनी यासंदर्भात फेसबुकला एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, दहशतवाद विरूद्ध संविधान... पोंक्षे या जाहीर चर्चेला. कधीही आणि कुठंही. नागपूरच्या संघ मुख्यालयात किंवा सनातनच्या गोव्याच्या मठात किंवा भाजपांकित कोणत्याही चॅनलवर... कुठे ही या, शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो. तुम्ही मोदी-शहांचे दिल्लीचे पोलिस आणि फडणवीसांचे मुंबईचे पोलिस घेऊन या. मला भीती वाटत नाही, एकटा चालत चालत येतो. आहे का तयारी?, अशा खुलं चॅलेंज त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे? प्रत्येक गावात असे विद्यालय हवेत, असे सावरकर कार्यक्रम व्हायला हवेत. या मुलांनी खूप छान कार्यक्रम केला. सगळ्या शिक्षकांना नमस्कार करायचा आहे, असे शिक्षक प्रत्येक शाळेत हवेत. संकल्पना सूचना आणि अंमलात आणणे अवघड असते.

मुलांनी छान कार्यक्रम केला आहे. मी त्यांचं कौतुक करतोय, असंही ते म्हणाले होते. ही मुलं बघा आणि दिल्लीतला मुलगा बघा, या मुलांना कळतंय आणि एवढा मोठा घोडा झाला तरी अजून गोळवलकर बोलता येत नाही, अशी टीका पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे नाव घेता केली होती.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि मराठी कलाविश्वातील गुणी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे म्हणून पोंक्षे हे ओळखेल जातात. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. उत्तम अभिनयासह शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा जाहीरपणे एखाद्या विषयावर भाष्य करत त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. त्यामुळे, बऱ्याचवेळा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT