Hasan Mushrif Eknath Shinde Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

ED च्या रडारवर असलेल्या मुश्रीफांच्या पोस्टरवर झळकले CM शिंदे, फडणवीसांचे फोटो; उलट-सुलट चर्चांना उधाण

शरद पवार व अजित पवार यांच्या फोटोच्या मधोमध शिंदे-फडणवीसांचे फोटोही वापरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजप-शिंदे शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या महाविकास आघाडीने रान उठविले आहे.

गडहिंग्लज : राष्ट्रवादी व हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे येथे २८ जूनला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला जात आहे. त्या उपक्रमाच्या जाहिरात पत्रकावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो वापरल्याने जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

कागल विधानसभा मतदारसंघातील सर्व गावातील घराघरांत शासन आपल्या दारी उपक्रम पोहचवणार असल्याचा संकल्प आठवड्यापूर्वी मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोडला होता. याच संकल्पातून २८ जून रोजी गडहिंग्लजच्या गणेश मंगल कार्यालयात हा उपक्रम होत आहे.

तत्पूर्वी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचावा म्हणून एक जाहीरात पत्रक राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले आहे. त्यावर शरद पवार व अजित पवार यांच्या फोटोच्या मधोमध शिंदे-फडणवीसांचे फोटोही वापरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लोगोजवळच हसन मुश्रीफ फौंडेशनचा लोगोही वापरल्याने हा उपक्रम संयुक्तपणे राबविणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप-शिंदे शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या महाविकास आघाडीने रान उठविले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांऐवजी शिंदे-फडणवीस यांचे फोटो पत्रकावर वापरल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम तयार झाला आहे.

ईडी कारवाईची पार्श्‍वभूमी आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुश्रीफ यांच्या जाहीरात पत्रकावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटो पाहून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

..म्हणूनच फोटो वापरले : मुश्रीफ

याबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम शासनाचा आहे. प्रशासनसुद्धा यात सहभागी असते. केवळ याच हेतूने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरले. यामागे ईडी किंवा दुसरे कोणतेही राजकीय कारण नाही. कोणीही याबाबत गैरसमज करुन घेवू नये.

हा उपक्रम राष्ट्रवादी व फौंडेशनतर्फे असल्याने केवळ पक्षाचे नेते शरद पवार व अजित पवार यांचेच फोटो वापरले असून आघाडीतील नेत्यांचे फोटो वापरण्याचा प्रश्‍न येत नाही. मुळात शासन आपल्या दारीमधील अनेक योजनांचा मी जन्मदाता आहे. त्या घराघरापर्यंत कशा पोहचवल्या जातात हे राज्याला दाखवण्यासाठी कागल मतदारसंघात हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT