Sheetal Mhatre Prakash Surve  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sheetal Mhatre Video : बोलण्यास त्रास होतोय; व्हायरल व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंची पहिली प्रतिक्रिया

शीतल म्हात्रेंनी आत्तापर्यंत अनेकदा माध्यमांशी बोलत आपली बाजू मांडली होती. मात्र प्रकाश सुर्वे यांच्या मौनामुळे चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Sheetal Mhatre Video : शिवसेनेच्या पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. म्हात्रे यांनी वारंवार माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पण प्रकाश सुर्वे यांच्या मौनामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता सुर्वे यांनी आपली बाजू मांडली आहे. (Prakash Surve on Viral Video with Sheetal Mhatre)

आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये आपली तब्येत ठीक नसल्याने आपण बोललो नाही, असं सुर्वे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड इस्पीतळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात आहे. त्यामुळे मी हे विस्तृत निवेदन देत आहे."

एकनाथ शिंदेंच्या कामाच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मोर्फकरणे खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करित आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

"शीतल म्हात्रे कानात काहीतरी सांगत होत्या"

प्रकाश सुर्वे पुढे म्हणाले, "प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीयोमध्ये चुकीचे गाणे लावून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीयो सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला."

या सर्व प्रकारामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास झाल्याचंही सुर्वे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT