uddhav thackeray and eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : शिंदे ठाकरेंची कोंडी करणार! आमदारांना व्हीप बजावणार, कार्यालये ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

Shivsena Row : शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरील हक्कावरून काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान काल (शुक्रवार) निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह हिसकावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. 

दरम्यान शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पालिकेतील आणि विधानभवनातील कार्यालये ताब्यात घेणार आहे, अशी माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी आणखी कोंडी करणार आहेत. 

तसेच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट शिवसेनेचा तांत्रिक भाग मानल्या जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे. 

अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बहुमताची गरज असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हीप बजावला जावू शकते, याचे पालन न केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. 

भरत गोगावले म्हणाले, नियमाप्रमाणे पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आमचा व्हीप लागू होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT