shinde vs thackeray shivsena supreme court hearing kapil sibal on Governors role maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Shinde : …तर सरकारच जाईल; सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण युक्तीवाद

रोहित कणसे

Thackeray Vs Shinde : राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये राज्यपालांची भूमीका काय होती याबद्दल युक्तीवाद केला

जुने विधानसभ अध्यक्ष आणि नवे विधानसभा अध्यक्ष त्यांचे अधिकार आणि आमदार अपात्रतेबाबदचा त्यांचा निर्णय या सगळ्यांवर सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तसेच राज्यपालांनी नियम डावलून शपथ दिली असेही सिब्बल म्हणाले.

यावेळी सिब्बल यांनी राज्यपालांचा हेतू आणि भूमीकेविषयी संशय व्यक्त केला. ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे राज्यपालांनी शिंदेंना बहुमत सिध्द करण्यासाठी बोलवलं हे चुकीचं असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. यावेळी राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर सरकारच जाईल असेही सिब्बल म्हणाले.

राज्यपालांच्या कृतीवर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेला राज्यपालांनी परवानगी दिली यावर सिब्बलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हे देखील निश्चित झालं नव्हतं. तसेच राज्यपालांना हे ठरवण्याचा राज्यघटनेनुसार अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कृती घटनाविरोधी होती.

राज्यपालांनी शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करून एकप्रकारे शिवसेनेतील फुटीलाच मान्यता दिल्याचे सिब्बल म्हणाले. सरकार स्थापन झालं, तोपर्यंत शिवसेनेतील फुटीचा कोणताही उल्लेख नव्हता. तोपर्यंत शिवसेना हा एक पक्ष होता आणि उद्धव ठाकरे त्याचे अध्यक्ष होते.

पण राज्यपालांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलंच नाही की तुम्ही भाजपाला पाठिंबा देताय की नाही? त्यामुळे एकनाथ शिंदेंना पाचारण करून राज्यपालांनी पक्षातल्या फुटीला मान्यताच दिली, ज्याचा त्यांना घटनेनं अधिकार दिलेला नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.

राज्यपालांनी कोणत्या आधारावर फुटीर गटाचा सरकार स्थापनेचा दावा मान्य केला? याचा निर्णय न्यायालयाने घेतला, तर बाकी सगळे प्रश्न सुटतील असेही सिब्बल म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT