Shirdi Muslim Mavala esakal
महाराष्ट्र बातम्या

निष्ठा असावी तर अशी! मुस्लीम मावळ्यानं उद्धव ठाकरेंसाठी चक्क रक्तानं लिहिलं पत्र

शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं पत्रात म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं पत्रात म्हटलंय.

शिर्डी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून सरकार देखील स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे.

मात्र, राहिलेली शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) महाराष्ट्रभरात संवाद यात्रा काढलीय. काल (शनिवार) संवाद यात्रेदरम्यान ते शिर्डीला होते. आदित्य ठाकरेंच्या शिर्डी (Shirdi) दौऱ्यात शिवसेनेच्या एका मुस्लीम मावळ्यानं (Muslim Mavala) स्वतःच्या रक्तानं आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं.

शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं पत्रात म्हटलंय. हे पत्र त्यानं आदित्य ठाकरेंना दिलंय. त्यानं लिहिलेल्या या पत्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्तांशी संवाद साधत या दौऱ्याची साईदर्शनानं सांगता झाली. मात्र, यादरम्यान मुस्लीम कार्यकर्त्यानं उचललेल्या या पावसामुळं लोक भावुक झालेत.

स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून कोल्हापूरच्या शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकानंही स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. स्वत:च्या रक्तानं लिहिलेलं पत्र त्या शिवसैनिकानं जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिलंय. त्यामुळं या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT