Shiv Jayanti
Shiv Jayanti sakal
महाराष्ट्र

Shiv Jayanti : संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा अशी न्यायव्यवस्था शिवरायांनी कशी उभी केली? जाणून घ्या प्रसंग

सकाळ डिजिटल टीम

Shiv Jayanti : मराठा साम्राज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक, आर्थिकदृष्ट्याच विकास केला नाही तर न्यायव्यवस्थेबाबतही महत्त्वाचे पाऊल उचलले.

शिवाजी महाराजांनी पंचायतपद्धतीच्या न्यायव्यवस्थेला प्राधान्य दिलेले आढळते. पंचायत पद्धती ही परंपरागत न्यायपद्धती होती. रुढीपरंपरेप्रमाणे चालत आलेले कायदे आणि प्रत्येक जातीनिहाय रुढ असलेले कायदे यांचा विचार करुन गावपंचायत न्यायदान करीत असे. (Shiv Jayant Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 how shivaji maharaj made Judiciary System so strong read story)

गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दगाबाजी करणे किंवा शत्रूपक्षाला जाऊन मिळणे यांची चौकशी करण्याचे काम सुभेदाराकडे किंवा देशाधिकाऱ्याकडे असे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाकडे न्यायाधीश हा एक प्रधान होता. स्वराज्यातील न्यायदानाची जबाबदारी न्यायाधीश या प्रधानावर असे. अत्यंत महत्त्वाचे खटले प्रत्यक्ष महाराजांसमोर चालत असत.

गोतसभेचे काही निवाडे महाराजांच्या उपस्थितीत झालेले आढळतात. धर्मविषयक खटले पंडीतराव या प्रधानापुढे चालत असत. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील ब्रह्मवृंद त्या त्या भागातील धर्मविषयक न्यायनिवाडे करीत असत.

नैतिक गुन्हयाविषयी स्वतः महाराज अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्याची स्थापन केली, त्या सुमारास एका गावच्या पाटलाने व्याभिचार केल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याचा एक हात आणि एक पाय तोडून महाराजांनी कडक शिक्षा केली होती. स्वराज्याशी बेइमान होणाऱ्या अधिकाऱ्यांना ते कडक शासन करीत असत.

अफजलखान प्रकरणी खंडोजी खोपडे या देशमुखाचे हातपाय तोडून त्यांना बेईमानीचे फळ दिले होते. स्वराज्यातील स्त्रियांना पूर्ण संरक्षण देण्याचे धोरण त्यांनी स्विकारले होते. एवढेच नव्हे तर युद्धप्रसंगी शत्रूपक्षातील स्त्रियांना आणि मुलांना जर कोणी पकडून आणले तर त्यांनाही महाराज शिक्षा करीत असत आणि साडी चोळीचा सन्मान देऊन स्त्रियांना परत पाठवीत असत. खाफीखान लिहितो की, 'शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर त्या स्त्रीचा सन्मान करून महाराज तिला तिच्या नातलगांकडे पाठवून देत असत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT