shiv sena leader sanjay raut appeal to mla amide maharashtra poliical crisis Sakal
महाराष्ट्र बातम्या

...का उगाच वण वण भटकताय? बंडखोर आमदारांसाठी राऊतांचं नवं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेना संकटात सापडली आहे. मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा संजय राऊत करताना दिसत आहेत. आता परत एकदा राऊतांनी ट्वीट करत चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते, असे म्हटले आहे. (shiv sena leader sanjay raut appeal to mla amide maharashtra poliical crisis)

शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभाग घेतला आहे. यामुळे राज्यातील मविआ सरकरा अस्थिर होण्याची शक्यता आहे, या सगळ्या अस्थिरच्या काळात संजय राऊत मात्र सगळं व्यवस्थित होऊ शकतं असा आशावाद व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत.. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!", अशी भावनिक साद त्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे.

यापूर्वी संजय राऊतांनी बोलताना शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) चर्चा करा, असं थेट आवाहन बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलं होतं. तसेच त्यांनी बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday November 2026: नोव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल 17 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद? पाहा संपूर्ण यादी

YUVRAJ SINGH: अभिषेक इशान वैभवला ऋतुराजला वनडे संघात स्थान द्या! युवराज सिंगने निवडकर्त्यांना सुनावलं; नेमकं काय म्हणाला?

Viral Video: मुंबईत महिला कार चालकाचा धुमाकूळ; पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील तीन ते चार वर्षांत ५० हजार विजेवर चालणाऱ्या बसची गरज, मुंबई महापालिका एकटीच १० हजार बस खरेदी करणार

Gangapur News: गंगापुरात किरकोळ वादातून चाकूहल्ला; उपचारादरम्यान २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT