Shahaji Patil vs Sharad Koli esakal
महाराष्ट्र बातम्या

Shahaji Patil : 'शहाजीबापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही'

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आहेत.

सोलापूर : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे गट आमनेसामने आहेत. दोघांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर राज्याचं राजकारण बदलून गेलंय. त्याच आता सेनेच्या शरद कोळी (Sharad Koli) यांनी आमदार शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यावर जोरदार टीका केलीय.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मी सांगोल्यात भाड्याने दोन बंगले घेऊन देईन, अशी टिप्पणी करणारे एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शरद कोळी यांनी जळजळीत शब्दांत टीका केलीय. शहाजीबापू हे त्यांच्याकडं बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत, असं सांगतात. एवढंच नव्हे तर हातभट्टीची दारु प्यायल्यानंतर शहाजी पाटील त्याचं बिलही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना काय घर बांधून देणार, असा टोला कोळी यांनी लगावलाय.

ते शुक्रवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद कोळींनी शहाजी पाटलांचे अक्षरश: वाभाडेच काढले. आमदार होण्यासाठी शहाजीबापू मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा त्यांना विसर पडलाय. शहाजी पाटलांनी वायफळ बडबड बंद करावी, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशाराही शरद कोळी यांनी दिलाय. ते संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही, अशी बोचरी टीकाही कोळींनी शहाजीबापूंवर केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT