sada sarvankar meet mns chief raj thackeray maharashtra
sada sarvankar meet mns chief raj thackeray maharashtra  esakal
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले...

धनश्री ओतारी

शिंदे गटातील सदा सरवणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येण्यापूर्वी मनसे शिंदे गटासोबत जाणार अशी चर्चा होती. दरम्यान, सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आलं आहे. (shiv sena mla sada sarvankar meet mns chief raj thackeray maharashtra politics)

माध्यमांसी बोलताना सरवणकरांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण स्पष्ट केलं आहे. सेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत अशी चर्चा रंगली आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एक हिंदूत्वाची लढाई आहे. अखंड हिंदू एकत्र करण, आणि त्यांच्यासाठी झगडनं हेच त्यामागचं उद्देश आहे.

आगामी निवडणुकाबाबत विचारले असता, हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असे सरवणकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर आज सकाळी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, माध्यामांशी बोलताना त्यांनी सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर दादर परिसरात वर्चस्व निर्माण करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला होता. पण हे यश कायम राखण्यात मनसेला अपयश आलं. शिवसेनेनं सदा सरवणकर यांचं तिकीट कापून आदेश बांदेकर यांना दिल्यानंही सरवणकर नाराज होते. पण २०१९ च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सदा सरवणकर शिंदे यांच्या बंडानंतर थेट त्यांच्या गटात सामील झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT