Shivani Wadettiwar controversial statement on veer Savarkar watch video  
महाराष्ट्र बातम्या

Shivani Wadettiwar : "बलात्काराला राजकीय हत्यार म्हणणारे सावरकर प्रेरणास्थान कसे?" शिवानी वडेट्टीवारांचे विधान

रोहित कणसे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतंत्र्यविर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा काँग्रेसला दिला. यानंतर आता पुन्हा एकाद काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवरा यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत खलबळ उडाली आहे.

सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला, ते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे असे सांगत, असा दावा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटू शकतं.

व्हि़डीओत काय म्हटलंय?

शिवानी वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या शिवसेना-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेबद्दल बोलताना दिसत आहेत. यामध्ये त्या म्हणाल्या की,

हे लोकं फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारी कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर कुठला मोर्चा काढतात सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा कढून काय करतात. मला आणि इथं महिला बसलेल्या सर्व उपस्थित महिलांना आहेत त्या सगळ्यांना भिती वाटत असेल. कारण की सावरकरांचे विचार होते की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरलं पाहीजे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यानंतर माझ्यासारख्या इथं उपस्थित महिला भगिनींना कसं सुरक्षित वाटेल? अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात, असे वडेट्टीवार म्हणाल्या. त्यांनी या व्हिडीओला बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे? असा सवाल देखील केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे घेतलेल्या भर सभेत जाहीर केले होते की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी सहन करणार नाही . मात्र, महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून सावरकरांचा अपमान सुरूच आहे.

कोण आहेत शिवानी?

शिवानी वडेट्टीवार या माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत. तसेच महाराष्ट्र यूथ काँग्रेसच्या सचिव म्हणून काम पाहातात. चंद्रपूरच्या राजकारणात त्या सक्रिय आहेत.

भाजप नेते काय म्हणाले..

नेतेच जर स्वतंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजू शकतलो नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसवर एकीकडे राग आणि दया देखील येते. काँग्रेस राजकीय आत्महत्या करण्याच्या मार्गावर निघाली आहे. काँग्रेस स्वैराचारी स्वातंत्र्य जन्माला घालतंय. त्यांचा हा स्वैराचार कधीही माफ करणार नाही असेही मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तान स्पर्धेतून आऊट होताच ३ सेमीफायनलिस्ट पक्के; आता तिकीटासाठी शर्यत, पण कसे आहे समीकरण?

आजचे राशिभविष्य - 01 मार्च 2026

Mushroom Omelet Recipe: मुलांसाठी नाश्त्यात 10 मिनिटांत तयार करा हेल्दी मशरूम ऑम्लेट; वीकेंड होईल स्पेशल

Panchang 1 March 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

IPL 2026: CSK च्या तयारीला सुरुवात! धोनीसह कर्णधार ऋतुराजची महाराष्ट्राच्या 'धुरंधरां'सोबत चेन्नईत एन्ट्री; पाहा Video

SCROLL FOR NEXT