Ajit Pawar - Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: “अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत”

शिवसेनेच्या खासदारांची अजित पवारांवर खोचक टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिंदे-फडणवीस सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळेही त्यांच्यावर विरोधकांकडे जहरी टीका केली जात आहे. त्यातच आता 2 हजारच्या नोटा बंदीनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या दोन हजारच्या नोटाबंदीनंतर काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य आणि केंद्रावर जोरदार टीका केली. या टीकेला खासदार प्रतापराव जाधव उत्तर दिलं आहे.

प्रतापराव जाधव म्हणाले की, 'सत्तेत असताना अजित पवार ज्या मस्तीने वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वागत नाहीत'. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नये असा खोचक टोला अजित पवार यांनी राज्य सरकारला लगावला होता.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक असा सामना राज्यात रंगला आहे. आपल्या वेगवेगळ्या निर्णयामुळेही शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता 2 हजारच्या नोटा बंदीनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे.

यावेळी बोलताना प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे तुरुंगातील दिवसावर पुस्तक लिहिणार आहेत, त्यामुळे त्यांना पुस्तक लिहण्याची गरजच नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांना सामना हे वृत्तपत्र काहीही लिहिण्यासाठी खुला करून दिला असल्याची टीकाही खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT