Shivrajyabhishek Din 2024  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Shivrajyabhishek Din 2025 : शिवरायांच्या राजमुद्रेत काय दडलंय? जाणून घ्या खास गोष्टी

Rajmudra Explained: Meaning and Symbolism: किल्ले रायगडावर आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता.

दिपाली सुसर

Shivrajyabhishek Din 2025 : आज शिवराज्याभिषेक दिवस. किल्ले रायगडावर (Raigad) आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता. हा सोहळा तब्बल ९ दिवस चालला होता. छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानचं!शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात.

ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्य स्थापलं. त्या काळात आणि त्याच्या आधी निजमशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्धी, पोर्तुगिज आणि इंग्रज या परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती.

हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली.शहाजीराजांनी शिवरायांना राजमुद्रा (Rajmudra)आणि प्रधानमंडल देऊन त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक अर्थ दडला आहे. तो अर्थ नेमका काय आहे हेच आपण पाहणार आहोत.(Rajmudra in Marathi)

"प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।"

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ होतो.

अत्यंत खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहजच आपल्या लक्षात येते.राजमुद्रेतला प्रत्येक शब्द हा अत्यंत विचारपूर्वक मांडण्यात आला होता. राजमुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई, संशयिताकडून 1 कोटी 48 लाख 64 हजारांची रोकड जप्त

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT