Ramdas Kadam v/s uddhav Thackeray matoshree Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Kadam: "बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे का?"

कदमांनी आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटात गेलेले रामदास कदम यांनी काल ठाकरे कुटुंबीयांवर जहरी टीका केली आहे. बाळासाहेबांना वाटत असेल की सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे. तसंच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्यावरही कदमांनी निशाणा साधला आहे.

रामदास कदम काल आपल्या दापोली इथल्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे परिवारावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, असंही कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे की काय, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे आज असते, तर सोनिया गांधींच्या नादाला लागून आपला मुलगा बिघडला, असं विधान कदम यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले, "सारखं सांगतो, मी बाळासाहेबांचा मुलगा, हो मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो पण किती वेळा सांगशील? तुला काही संशय आहे का? किती वेळा सांगशील. अरे हो ना, आम्ही कुठे नाही म्हणालो. आम्ही कधी म्हणालो का तू बाळासाहेबांचा मुलगा नाहीस." रश्मी ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, "रश्मी वहिनी कुठेही गेल्या तरी व्यासपीठावर सोबतच. मला आश्चर्य वाटत त्या सगळीकडे कशा येतात? मांसाहेब कधी कुठे गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत."

आदित्य ठाकरेंना कदमांनी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. कदम म्हणाले, " त्याने पोराला सांगितलं पाहिजे आधी लग्न करुन बघ. बायको आली की मग संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय आहे. लग्न तर करुन बघ मग कळेल संसार काय असतो ते. मग खोके काय असतील ते कळेल ना."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलयाचा धोका! भोटेकोसी नदी फुगली; ७८८ मृत्यू, तीन हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता

SCROLL FOR NEXT