Shivsena political News latest update 
महाराष्ट्र बातम्या

विरोधकांकडे आता बोलायला काय राहिलं? शिवसेनेचा सवाल

काही नेत्यांचा या नामकरणाला विरोध होत असतानाच शिवसेनेनं निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही नेत्यांचा या नामकरणाला विरोध होत असतानाच शिवसेनेनं निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकराणाला नवं वळण लागल आहे. (maharashtra politics) राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देत त्यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असल्याचे स्पष्टे केलं. दरम्यान, आता राज्यातील सत्तेसाठी भाजपाने हालाचाली वाढवल्या आहेत. (Shivsena political News latest update)

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नामांतरांचा मुस्लिम समाजानाने अयोध्येच्या निर्णयाप्रमाणे स्वीकार करावा अशी इच्छा शिवसेनेनं व्यक्त केली आहे. यासोबतच नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात देण्यात आली आहे.

दरम्यान, यामागील राजकीय हेतूबद्दल चर्चा होत असताना शिवसेनेनं हा निर्णय भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर करण्यासाठी घेण्यात आल्याचं 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. इम्तियाज जलील, अबू आझमी यासारख्या नेत्यांकडून या नामकरणाला विरोध होत असतानाच शिवसेनेनं या निर्णयामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच यातून हे निर्णय घेतल्याने अनेकांच्या पोटात गोळा आल्याचे सांगितले आहे.

नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबत अनेकांच्या पोटात गोळा उठला तरी त्याची पर्वा न करता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

मध्यंतरीच्या काळात ठाकरे सरकार औरंगाबादचे संभाजीनगर करायला का घाबरते, असे सवाल राज्यातील विरोधी पक्षाने केले होते. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ज्या नम्रतेने देशभरातील मुसलमान समाजाने स्वीकारला तीच भूमिका संभाजीनगरबाबत ठेवायला हवी होती. खरे तर फडणवीसांची महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना त्यांनी हे पुण्यकर्म का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यायला हवे, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.

दि.बा. यांचा शिवसेनाप्रमुखांशी स्नेह होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘दि.बा.’चे नाव देऊन उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या लढयाचा गौरव केला आहे. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झाली. शिवरायांच्या विचारांचा भगवा तिने जगात फडकवला. संभाजीनगर, धाराशीव व ‘दि.बा.’च्या निर्णयाने महाराष्ट्रातील अस्मितेला तेज प्राप्त झाले व ठाकरे सरकार उजळून निघाले. विरोधकांकडे आता बोलायला काय राहिले?, असा प्रश्न लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambabai Temple Kolhapur : 'अंबाबाई मंदिराला 15 दिवसांत 'प्राचीन'चा दर्जा द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार'; सर्किट बेंचचा महत्त्वपूर्ण आदेश

Sant Balumama Temple Scam : मोठी बातमी! संत बाळूमामा देवस्थानात तब्बल 60 कोटींचा घोटाळा; माजी प्रशासकासह देवस्थान समिती सचिवांवर गुन्हा दाखल, भाविकांमध्ये तीव्र संताप

Live Updates Marathi : राष्ट्रीय सन्मानाचा अवमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा

Shrirampur Crime: सोनू बेगचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती, श्रीरामपूरमध्ये ‘पोक्सो’अंतर्गत अटक

Pune Mumbai Missing Link: १२४९ मिमी पाऊस झाला तरी मिसिंग लिंक सुरक्षित राहणार, १ हजार वर्षांच्या पर्जन्यमानाचा वेध; मुंबई आयआयटीचा अहवाल

SCROLL FOR NEXT