Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : चिन्ह गोठवलं; पुढचा लढा सर्वोच्च न्यायालयात? ठाकरे-शिंदेंपुढे कायदेशीर मार्ग काय?

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेच्या या वादातल्या कायदेशीर बाबींबद्दल माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईत कोणाच्याच हाताला अजून काहीच लागलेलं नाही. उलट शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोघांनाही हे चिन्ह आणि नाव वापरता येणार नाही. यानंतर आता दोन्ही गटांपुढे काय पर्याय आहेत, हा लढा सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाऊ शकतो का?

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याविषयीच्या कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम नाही, हे निकम यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे या प्रकरणी सुनावणी होईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल. आता या दोन्ही गटांना पुढे काय करता येईल, कोणते मार्ग मोकळे आहेत? कायदा काय सांगतो?

सर्वोच्च न्यायालयाकडे जाता येईल का?

या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतली एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये जर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना उमेदवार उभे करायचे असतील, तर ते निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दल सहा महिन्यात आयोगाने निकाल देणं अपेक्षित आहे. आत्ता दोन्ही गटांनी आय़ोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. तोंडी पुरावे काय दिले जातायत, हेही लक्षात घेतलं जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग निकाल देईल आणि पक्षाचं भवितव्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

देऊळ बंद 2 साठी पैसे नव्हते तेव्हा मदतीला धावून आला शाहरुख खान, प्रवीण तरडे म्हणाले...'त्यांनी 'बिल माफ करो' म्हणत...'

Latest Marathi News Live Update : वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT