statement against supriya sule Abdul Sattar Abid Naik politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar: सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होण्याच्या चर्चेवर अब्दुल सत्तार म्हणतात...

शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार, सुप्रिया सुळे अध्यक्षा होणार असल्याच्या राज्यात चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यावर शिवसेनेचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षा झाल्या तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या आवडण्याने न आवडण्याने फरक पडला असता, तर मी माझी प्रतिक्रिया दिली असती, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले आहेत.

शरद पवार देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय करावं, हे माझ्या सारख्या कार्यकर्त्याने सांगण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत. त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाला असतो. तो त्यांनी घेतला आहे. अंतिम निर्णय तेच घेऊ शकतात. मी त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्याइतका मोठा पुढारी नाही, असंही पुढे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राज्यसह देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रफुल पटेल ही नवे चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT