Ramdas Kadam VS Anil Parab google
महाराष्ट्र बातम्या

रामदास कदम यांच्या गंभीर आरोपानंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रामदास कदम शिवसेनेला (Shivsena Leader Ramdas Kadam) रामराम ठोकणार असल्याचा चर्चा आहेत. कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी त्यांनी अनिल परब (Minister Anil Parab) यांच्यावर थेट आरोप केलेत. अनिल परब हे सेनेतील खरे गद्दार आहेत. शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा परबांचा डाव असल्याचा आरोप कदमांनी केला. यावर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये (Ramdas Kadam VS Anil Parab) एका कथित ऑडिओ क्लिप प्रकरणापासून वाद सुरू झाला होता. हा वाद आता टोकाला पोहोचला आहे. ''कोणाची हकालपट्टी करायची हे अनिल परब जाहीरपणे घोषणा करतात. माझ्याविरोधात माध्यमांमध्ये बातम्या पेरतात. अख्ख आयुष्य शिवसेनेसाठी खर्ची घातलं. जेव्हा पक्षावर वेळ होती तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या गाडीत समोर बसायचो. आज आमच्यावर अशी वेळ आलीये. आम्हाला अशी वागणूक दिली जाते. आता आम्हाला प्रश्न पडलाय पक्षप्रमुख अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे आहेत?'' असं रामदास कदम म्हणाले. अनिल परब यांनी वारंवार आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, ते माझ्या मुलाचं तिकीट कापण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप रामदास कदमांनी केले.

अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया -

रामदास कदमांनी केलेल्या आरोपांबद्दल अनिल परबांना विचारले असता ते म्हणाले, ''मी रामदास कदम यांच्या आरोपावर काहीही बोलणार नाही. मी खरा शिवसैनिक आहे.'' सध्या शिवसेना सोडणार नाही, अशी भूमिका रामदास कदम यांनी जाहीर केली आहे. पण, मुलांसाठी मार्ग मोकळा आहे, असं ते म्हणाले. कदमांच्या आरोपानंतर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT