पूरग्रस्त महिलेशी भास्कर जाधवांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप
मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव हे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका महिलेशी बोलताना दमदाटी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या पूराची परिस्थिती आहे. लोक विचित्र अशा त्रासाने ग्रासले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांनी भास्कर जाधवांची कानउघाडणी केली. (Shivsena MLA Bhaskar Jadhav angry on flood affected woman Sanjay Raut advice to stay calm in difficult situation)
"भास्कर जाधव यांच्याबाबत काय घडले? ते मी प्रत्यक्षात पहिलेले नाही. वृत्तपत्रातून वाचलेले आहे. त्यामुळे तेच त्यावर बोलतील. लोकांचा आक्रोश, वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सरकार तेच करत आहे. अशा वेळी संयम बाळगणे हेच योग्य ठरेल. कारण महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे", असे राऊत म्हणाले.
याशिवाय, या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारनेही मदतीचा हात पुढे करावा, असे त्यांनी नमूद केले. "महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी", असे ते म्हणाले. तसेच, "मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे. महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले, त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. महाराष्ट्राला उभं करायला मदत करावी. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत. त्यांनीसुद्धा मदत करायला हवी", असं आवाहन संजय राऊत त्यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.