महाराष्ट्र बातम्या

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनासमोर चोपलयाशिवाय राहणार नाही!

सकाळ वृत्तसेवा

वेळ आल्यास शिवसेना भवन फोडू, असं वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ असं म्हणत एकप्रकारे इज्जतच काढली आहे. रविवारी सकाली प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यासह नितेश राणे यांचाही समाचार घेतला. शिवाय ट्विट करत आपला रोष व्यक्त केला.

"राष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?" असं ट्विट करत राऊत यांनी प्रसाद लाट आणि नितेश राणे यांच्यावर बोचरी टीका केली.

नितेश राणे यांनी शिवसेना भवन हे कलेक्शन भवन झालंय, अशी टीका केली होती. यावरही पत्रकारांनी विचारलं असता राऊत म्हणाले की, 'काही माणसं गांजा पिऊन बोलतात, त्यांच्याकडे कुठं लक्ष द्यायचं.'

काय म्हणाले होते लाड?

भाजपच्या माहीम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमाला नितेश राणेही उपस्थित होते. यावेळी लाड म्हणाले की, नितेशजी, पुढील कार्यक्रमला कायकर्ते थोडे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलिस जास्त येतात. फक्त पोलिसांना गणवेश घालून पाठवू नका, असे सांगायला पाहिजेच. कारण त्यांना तुमची आमची इतकी भीती आहे की आण माहीमध्ये जरी आलो तरी त्यांना वाटतं की हे शिवसेना भवन फोडणारच... काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

लाड यांचं स्पष्टीकरण

प्रसारमाध्यांतून माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. मी शिवसेना भवन फोडणार, अशा बातम्या दिसत आहे. पण यावर स्पष्टीकरण देऊ इच्छितो. असं मी काही करणार नाही. पण, जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेनेचं उत्तर दिलं जाईल. ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही. मला असं म्हणायचं होतं की, आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांत या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यावर माझं स्पष्टीकरण. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना भवनाबद्दल अनादर करायचा नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT