Eknath shinde Uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : ठाकरे- शिंदेंना हवं असलेलं नवं नावही सारखंच; एकानंतर दुसरा वाद सुरू

नव्या नावावरही दोघांनी एकत्र दावा सांगितला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना कोणाची, हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पुढे सर्वोच्च न्यायालयाने हा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला. निवडणूक आयोगाने कोणाच्याही पारड्यात शिवसेना टाकली नाही. त्यानंतर आता दोन्ही गट आपल्या समोरचे पर्याय शोधत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा शिवसेनेतल्या दोन्ही गटांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यानंतर दोघांनीही पक्षावर दावा सांगितला. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हच गोठवलं. त्यामुळे आता कोणालाही शिवसेना असं नाव वापरता येणार नाही. त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट अशा प्रकारची नावं वापरता येतील. शिवसेना कोणाची हा वाद संपतोय असं वाटत असतानाच नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आता ठाकरे आणि शिंदे दोघांनीही 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी केलीय. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय देऊनही पुन्हा नावाचा नवा वाद निर्माण झालाय. आता या नव्या वादामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नावही दोन्हीपैकी कोणत्याही गटाला मिळणं अवघड आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव ही शिवसेनेची मोठी ओळख आहे. दोघांनीही दावा केला असता निवडणूक आयोगाची भूमिका अशी असते की आयोग दोघांपैकी कोणाच्याही बाजूने निकाल देत नाही. त्यामुळे आता हा नवा वाद कोणत्या दिशेला जातोय, हे पाहण्यासारखं असेल.

नाव गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होत नाही, तोवर हा निर्णय़ लागू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT