shivsena Sanjay Pawar first reaction after getting nomination for Rajya Sabha  
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेकडून राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी संजय पवार (Samjay Pawar) यांच्या नावाची शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. यादरम्यान खासदारकीसाठी निवड झाल्यानंतर संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी माझ्या नावाची घोषणा केली याचा मला खूप आनंद झालेला आहे, जो शिवसैनिक तीस वर्षापासून अखंड कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात काम करतोय , जो पंधरा वर्ष नगरसेवक आहे, चौदा वर्ष जिल्हा प्रमुख आहे, शहर प्रमुख होता, जो सर्वसामान्य शाखा प्रमुखापासून इथपर्यंत पोहचला असं कोणत्या पक्षात होतं, हे फक्त शिवसेनेत होतं, म्हणून शिवसेनेला सलाम, ज्यांनी लोकांनी मला संधी दिली त्यांचे आभार, असे ते म्हणाले आहेत.

उमेदवारी मिळाल्याने मला तयारी करावी लागणार आहे, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे व सर्व नेत्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करून दाखवणार, सर्व कागदपत्रांची पूर्तता आज होईल, काही अडचण नाही असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या सोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असे देखील त्यांनी सांगीतले.

असं म्हटलं जातं की डमी उमेदवार दिला जातो, तर शिवसेनेने डमी उमेदवार दिला आहे का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, डमी असूदे की हिरो असूदे उध्दव ठाकरे हे आमचे बॉस आहेत आणि बॉस इज अलवेज राईट, ते जे काही निर्णय घेतील तो मानणारा शिवसैनिक आहे असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स संपवत कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं असून, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगीतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाला गती प्रवास जलद; ३२ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीवर बंदी? श्रीलंकन ​​खेळाडूला ढकल्यामुळे अडचण, नियम काय सांगतो? समोर आली मोठी माहिती

Ahilyanagar: पहिल्याच दिवशी शाळा बंद, ७ वर्गांना फक्त ३ शिक्षक; पालक संतप्त

Solapur: गडकरींची संकल्पना, ६०-७० किमी रस्त्याचं काम ९ वर्षांपासून सुरू; तांदूळवाडी अपघात प्रकरणी ठेकेदार कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा

Latest Marathi News Live Update : नागपुरात कोकरोच जनता पार्टीचे आज आंदोलन

SCROLL FOR NEXT