Shivsena Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : 'धनुष्यबाणा'वर दावा सांगणारे शिंदे पहिलेच नाहीत; सेनेच्या चिन्हांचा इतिहास जाणून घ्या..

हा धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी मानला जातो. हे चिन्ह मिळण्याच्या आधीही इतर चिन्हांवर शिवसेना निवडणुका लढली पण तिथे हार मानावी लागली होती.

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेनेवरुन चाललेल्या चढाओढीसंदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आयोगाने पुढील आदेशापर्यंत गोठवलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना इतर चिन्हांचा विचार करणं भाग आहे. पण सध्याच्या या धनुष्यबाण चिन्हाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

हा धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी मानला जातो. हे चिन्ह मिळण्याच्या आधीही इतर चिन्हांवर शिवसेना निवडणुका लढली पण तिथे हार मानावी लागली होती. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना पूर्वी एक संघटना होती, जी सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक उद्देशाने स्थापन करण्यात आली. त्यावेळी शिवसेना राजकारणात अगदी २० टक्केच सक्रिय होती. पण त्यानंतर या संघटनेने १९६८ मध्ये राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आणि शिवसेना राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाली.

या आधी सेनेला निवडणुकांचा कसा अनुभव आला?

शिवसेनेने पहिली निवडणूक १९७१ साली लढली होती. पण त्यावेळी तिथे त्यांना यश मिळालं नाही. १९८९ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार निवडून आला. या मधल्या काळात म्हणजे १९७१ ते १९८४ या दरम्यान शिवसेनेने अनेक चिन्हे बदलली. खजुराचं झाड, ढाल तलवार, रेल्वे इंजिन अशी अनेक चिन्हे शिवसेनेने आधी वापरली होती. १९८४ साली भाजपाच्या 'कमळा'वरही शिवसेनेने निवडणूक लढवल्याच्या काही नोंदी आढळतात. १९८५ मध्ये शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली, त्यावेळी त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह स्विकारलं आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सत्तेत आली.

१९८९ मध्ये शिवसेनेचे चार खासदार धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले. डरकाळी फोडणारा वाघ हा तर सेनेच्या प्रत्येक पोस्टरवर, झेंड्यावर पूर्वीपासूनच होता. पण आता धनुष्यबाण हे अधिकृत पक्षचिन्ह बनलं होतं. त्यानंतर आजपर्यंत पक्षाने हेच चिन्ह कायम ठेवलं होतं.

यापूर्वीही धनुष्यबाणावर दावा सांगण्यात आला होता...

यापूर्वीही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगण्यात आला होता. झारखंड मुक्ति मोर्चाने याआधी धनुष्यबाण या चिन्हाची मागणी केली होती. त्यावेळी आयोगाने स्थानिक आणि जुना पक्ष असल्याने झारखंड मुक्ति मोर्चाला हे चिन्ह दिलं होतं. त्यामुळे तुतारी वाजवणारा व्यक्ती या चिन्हावर शिवसेनेला त्या वर्षी निवडणूक लढवावी लागली होती. त्यावर्षी सेनेचा एकही उमेदवार जिंकू शकला नव्हता. त्यानंतर १९८९ मध्ये शिवसेनेने सामना या मुखपत्राची सुरुवात केली आणि याच वर्षीपासून शिवसेनेने धनुष्यबाण हे आपलं चिन्ह निश्चित केलं. पुढच्या सगळ्या निवडणुका याच चिन्हावर लढवण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT