Eknath Shinde vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: सेनेचा दसरा मेळावाही शिंदे गटच घेणार? छुप्या प्रयत्नांची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेला दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी हा मेळावा होता. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता दसरा मेळाव्याचं काय होणार हा प्रश्न आहे.

दरवर्षी होणाऱ्या या मेळाव्याला यंदा मुंबई महानगरपालिकेने परवानगी अद्याप दिलेली नसल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबद्दल महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती हाती येत आहे. तसंच शिंदे गट या मेळाव्यासाठी आता मागच्या दाराने प्रयत्न करत असल्याचंही कळतंय.

दसरा मेळाव्यासाठी आता शिंदे गट परवानगी मागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पण परवानगी मिळाल्यावर फक्त एकनाथ शिंदेच (Eknath shinde) मार्गदर्शन कऱणार की फडणवीसही (Devendra Fadnavis) बोलणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला, त्यांनी पक्षाच्या चिन्हावरही दावा सांगितला आहे. आता शिंदे गट दसरा मेळावाही हायजॅक करणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याविषयी सूचक विधान केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेतील, याबाबत मला माहित नाही. गृहमंत्री म्हणून सांगतो, नियमात जे बसेल, त्याप्रमाणेच केलं जाईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तर शिवतीर्थावरच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार, असा विश्वास मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT