Ramdas Kadam 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना शोधतेय रामदास कदम यांना पर्याय

शिवसेनेकडून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवले. फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते.

वैदेही काणेकर

मुंबई: आमदार रामदास कदम (ramdas kadam) यांच्याबद्दल सध्या शिवसेनेत (Shivsena) नाराजीची भावना आहे. याचा फटका त्यांना विधान परिषद (Mlc) निवडणुकीच्यावेळी बसण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जात आहे. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद पुरवली, असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.

या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. अलीकडेच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण रामदास कदम यांना देण्यात आले नव्हते. निमंत्रण देण्याचे टाळले, त्यामागे कोरोना नियम, ५० टक्के उपस्थितीचे कारण देण्यात आले होते. खरंतर रामदास कदम हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत. शिवसेनेकडून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवले. फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते. त्यामुळे इतक्या वरिष्ठ नेत्याला दसरा मेळाव्याला न बोलावल्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास कदम यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे. रामदास कदम यांची विधान परिषदेचे मुदत 2022 ला संपत आहे. त्यांचे सदस्यत्व कायम ठेवले जाणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे.

पक्षाला उपयोगी पडणारा, नियम न तोडणारा, आणि तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. विधान परिषदेत रामदास कदम यांच्याजागी विभागप्रमुख किंवा युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT