shraddha walker murder case
shraddha walker murder case  
महाराष्ट्र

Shraddha Murder Case : त्याने ३५ तुकडे तोडले, मी ७० करीन; तरुणाची लिव्ह इन पार्टनरला धमकी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : श्रद्धा वालकरचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने केलेली निर्घृण हत्या प्रकरण ताजे असताना महाराष्ट्राच्या धुळ्यातील एका व्यक्तीने या हत्येचे उदाहरण देत आपल्या लिव्ह-इन पार्टनरला धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केले तर मी तुझे ७० तुकडे करीन'...अशी धमकी अर्शद सलीम मलिकने आपल्या लिव्ह-इन पार्टनरला दिली आहे. (Saddha Murder Case news in Marathi)

महिलेच्या म्हणण्यानुसार, अर्शद सलीम मलिकने तिच्यावर बलात्कार केला होता, तसेच घटनेच्या व्हिडिओ क्लिप्सद्वारे तो तिला ब्लॅकमेल करत होता. यानंतरच तिने मलिकसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत इंडिया टुडेने २९ नोव्हेंबर रोजी वृत्त दिलं आहे.

महिलेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती अर्शद सलीम मलिकला पहिल्यांदा भेटली, तेव्हा त्याने त्याचं नाव हर्षल माळी असल्याचं सांगितलं होतं. जुलै २०२१ पासून आम्ही एकत्र राहत आहेत. पीडित महिलेचे यापूर्वी दुसऱ्या पुरुषाशी लग्न झाले होते. पण 2019 मध्ये तिच्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून 5 वर्षांचा एक मुलगाही आहे.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आम्ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र करत होतो तेव्हा म्हणजे जुलै 2021 मध्ये तिला अर्शदची खरी ओळख पटली होती. काही दिवसांपूर्वीच एका न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने अर्शद सलीम मलिकवर जबरदस्तीने धर्मांतर करायला लावल्याचा आरोप केला, तसेच आपल्या मुलाचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.

या महिलेने अर्शद मलिक आणि त्याचे वडील या दोघांवरही आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. धर्मांतराला विरोध केल्याबद्दल मलिकने सायलेन्सरने तिची त्वचा जाळल्याचा आरोप तिने केल्याचं पोलिसांना सांगितलं.

दरम्यान मी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला, तेव्हा मलिकने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा संदर्भ देत मला धमकी दिली. आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे केले आहेत, परंतु मी तुझे ७० तुकडे करीन," अशी आपल्याला धमकी दिल्याचं महिलेने पोलिसांना सांगितले.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT