nitesh rane judicial custody esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंचा मुक्काम कोठडीतच, पण...

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. पण, न्यायालयानं १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलिस कोठडी संपली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीत असणार आहे. आज जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गातील शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केली होती. त्यानंतर संशयाची सुई भाजप आमदार नितेश राणेंभोवती फिरत होती. त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता ते हजर झाले नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत होते. पण, नितेश राणे कुठे होते? हे कोणाला माहिती नव्हते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयाला शरण येण्यास सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज देखील केला. पण, राणेंनी शरण न येता अर्ज केला, असं म्हणत न्यायालयानं जामीन फेटाळून लावला. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, कणकवली पोलिसांनी संतोष परब हल्लाप्रकरणी चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयानं नितेश राणेंना पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी गोव्याला नेल्याची माहिती देखील होती.

नितेश राणेंना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजून युक्तीवाद करण्यात आला. आमची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे नितेश राणेंची पोलिस कोठडी वाढवून द्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. आता न्यायालयानं त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण, राणेंकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पण, ही प्रक्रिया किती वेळ घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असं राणेंच्या वकिलांकडून सागंण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT