Smriti Irani Esakal
महाराष्ट्र बातम्या

गोव्यात स्मृती इराणी पोहचताच शिवसैनिकांची घोषणाबाजी अन्...

किरीट सोमय्या यांच्या नंतर स्मृती इराणी शिवसैनिकांच्या आमने सामने

सकाळ डिजिटल टीम

पणजी : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)हे आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात (Goa Assembly Election 2022) आहेत. त्यांच्यासोबत संजय राऊत आणि इतर नेतेही प्रचारासाठी आले आहेत. आज दिवसभरात सेनेने भाजवर टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. गोव्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. किरीट सोमय्या यांच्या नंतर आता प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी शिवसैनिकांच्या आमने सामने आल्या. आक्रमक शिवसैनिकांना (Shivsena) पाहून स्मृती इराणींनी (Smriti Irani) तेथून काढता पाय घेतला.

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी या विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आला रे आला कोण आला..शिवसेनेचा वाघ आला, आवाज कुणाचा..शिवसेनेचा, अशा घोषणा शिवसैनिक देत होते. त्यावेळी स्मृती इराणी यांच्या स्वागतासाठी फारसे भाजप कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे आक्रमक शिवसैनिकांना पाहून स्मृती इराणींनी तेथून काढता पाय घेतला. त्या कारमधून बसून तेथून थेट निघून गेल्या.

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी या विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

दरम्यान आज किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सोमय्यां यांचे महानगरपालिकेच्या पायरीवरच सत्कार करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने त्याच पायऱ्यांचे गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केले. या प्रकारानंतर सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT